दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
डेहराडून:- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून सुरू आहे. त्यातला सर्वांत धक्कादायक निकाल आत्ता समोर आला आहे. बहुतेक सर्व राज्यांत कुणाचं सरकार येणार हे चित्र आता स्पष्ट होत असतानाच उत्तराखंडमधून मोठी बातमी आली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता टिकणार, बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचणार असं वाटत असतानाच मुख्यमंत्र्यांनाच जनतेने नाकारल्याची बातमी आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी निवडणूक हरले आहेत.
उत्तराखंडच्या 70 जागांसाठी मतदान झालं. या राज्यात कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि आपने अजय कोठियाल यांना दिली होती. भाजप विजयाच्या वाटेवर असतानाच धामी पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण ते स्वतःच निवडणूक हरले आहेत.