दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ, ७८अ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत छोटे अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज राज्य शासनाकडून अ व ब प्रवर्गातील रंतु सेवानिवृत अधिकारी कर्मचारी, अथवा मान्याप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि शासकीय सहकार व लेखा पदविका (जी. डी. सी. ण्ड ए), उच्चतम सहकार पदविका (एच. डी. सी. ) धारक, अथवा चार्टर्ड अकाउंटंट (सी. ए.) इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट ण्ड वर्कस अकाऊंटंट (आय. सी. डटल्यू. ए. ) कंपनी सेक्रेटरी (सी. एस.) अथवा सहकार खात्यातील प्रशासन / लेखापरिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आदी अथवा नागरी कर्मचारी सहकारी बँकेमध्ये व्यवस्थापक पदावर किमान पाच वर्षे काम केलेले व्यक्ती अथवा कायद्याचे पदवीधारक, संगणकीय ज्ञान आवश्यक. एम. एस. सी. आय. टी व अन्य समकक्ष उत्तम पात्रताधारक यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाच्या विहीत नमूने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड व लातूर विभागातील सर्व तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात दि. ४ ऑक्टोबर ते दि. १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील याबाबत जाहिर सूचना वरील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आले असल्याचे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी कळविले आहे…