
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई, दि. २३ :- पुणे जिल्ह्यातील भोर,पौड व वेल्हा येथील ग्रामीण रूग्णालयाच्या दर्जोन्नतीबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली. मुळशी, वेल्हा, भोर येथील ग्रामीण रूग्णालयाची दर्जोन्नती करण्याची मागणी विधानसभा सदस्य संग्राम थोपटे यांनी विधानसभेत केली.या प्रश्नोत्तराच्या चर्चेत विधानसभा सदस्य नमिता मुदंडा यांनी भाग घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, तालुक्याचे मुख्यालय ५० हजार लोकसंख्येपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केद्रांची संख्याही पाचपेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी दुसरे देखील ग्रामीण रूग्णालय देण्यात येते किंवा श्रेणीवर्धनही करण्यात येते.
रूग्णालयातील उपलब्ध खाटांपेक्षा जास्त रूग्णांची संख्या असेल तरीही श्रेणीवर्धन करता येते.मात्र रूग्णालयांच्या दर्जोन्नतीबाबत निर्णय घ्यायचा असल्यास नियम आहेत. भोर ५० ते १०० आणि वेल्हा ३० ते ५० यासंदर्भात प्रस्ताव उपसंचालक यांच्याकडे प्राप्त आहेत.मुळशी तालुक्यातील पौड ३० ते ५० यासंदर्भातही प्रस्ताव पाठवावा, याबाबतीत प्राधान्याने विचारात घेण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली.