
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.३१ शेंबा येथे ग्रामपंचायत व गावकरर्याच्या पुढाकाराने परिसरातील शालेय विद्यार्थ्यांकरिता तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तहसीलदार राहुल तायडे व समाधान वाघ यांच्या हस्ते अभ्याशिकेचे उद्घाटन करण्यात आले. याचा फायदा नक्कीच खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे. विद्यार्थ्यांनी व युवक-युवतींनी मोठे स्वप्न पाहून कायम प्रयत्नशील राहिले पाहिजे असा मूलमंत्र शेंबा येथे उद्घाटन प्रसंगी राहुल तायडे यांनी दिला.तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास मी सदैव तत्पर राहील असे आश्वासन गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी दिले.
तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सुद्धा हा अभ्यासिकेच्या पॅटर्न राबवावा असे आवाहन यावेळी राजेश गावंडे केले. शेंबा येथील अभ्याशिकेचा पंचक्रोशीतील गावातील विद्यार्थी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच ऍड. नंदकिशोर खोंदले यांनी केले.शेतकरी पुत्र अभ्यासिकेची प्रणेते व कृ.ऊ. बाजार समितीचे माजी संचालक राजेश गावंडे यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या शेतकरी पुत्र अभ्यासिका पॅटर्न राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवावा.
यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची नियोजन जिल्हाधिकारी व पालक मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यामार्फत शासनाला पाठवले आहे. त्याच धर्तीवर काही ग्रामपंचायती सुध्दा पुढाकार घेतला आहे. यावेळी राजेश गावंडे, वाचनालयाचे अध्यक्ष वि.ह. उज्जैनकर, उपसरपंच जगन्नाथ भोपळे, सदस्य प्रवीण भिडे, तसेच गावकरी मंडळी विजय जूनारे, मनीष कवळे, युवराज जुनारे, ग्रामसेवक पि.के.राठोड, ग्रामसेवक खराटे, संतोष बोरकर, रामेश्वर बावणे, विठ्ठल जुमळे,ज्ञानेश्वर जुमळे, सोनू बोरकर तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.