
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी राजेश गेडाम
गोंदिया :- गोंदिया जिला रग्बी असोसिएशन द्वारा आयोजित आमदार चषक जिल्हा स्तरीय रग्बी स्पर्धेचे आयोजन साकेत पब्लिक स्कूल गोंदिया येथे आयोजित केल्या गेल्या होत्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी अंतिम सामन्यात रंगतदार टक्कर झाली.या स्पर्धेत आमगांव, तिरोडा, अर्जुनी, गोरेगांव,मोर.अर्जुनी ,सालेकसा,देवरी ,आणि गोंदिया तालुक्याचा समावेश होता समापन समारोह कार्यक्रमात उपस्थित श्री. लोकेश यादव अध्यक्ष गोंदिया ज़िला रग्बी असोसिएशन , श्री पुष्पक जस्सनी सर VCA मेंबर ,श्रीमति रागिनी ब्राहमणकर वाइस प्रिंसिपल साकेत पब्लिक स्कूल,अभय अग्रवाल सामाजिक कार्यकर्ता, चेतन मानकर सचिव गोंदिया जिल्हा रग्बी असोसिएशन, विशाल ठाकुर अध्यक्ष गोंदिया ज़िला कराटे असोसिएशन ,संतोष बिसेन , नीलेश फुलबान्धे NIS कोच , दीपक सिक्का मास्टर ट्रेनर गोंदिया ज़िला कराटे असोसिएशन , मुजीब बेग मास्टर ट्रेनर NSDC INDIA , उपेंद्र थापा ,निखिल बरबाटे,बरकत बेग ,अंकुश गजभिये, नवशेन अली,खैरे सर, गहरवार सर,प्रयास उमाते, भूषण गौतम, विवेक बिसेन,आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुजीब बेग सर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन स्वागत केले झालेल्या अंतिम सामन्यात सीनियर मुले, गोंदियाच्या संघाने गोंदिया ने प्रथम स्थान पटकावले तर दूसरे स्थान गोंदिया ग्रमीण ने पटकावले सीनियर मुली मध्ये प्रथम स्थान गोंदिया सिटी तर दूसरे स्थान गोंदिया ग्रामीण राहिली. 17 वर्षे मुले यात गोंदिया सिटी प्रथम तर दूसरे स्थान गोंदिया ग्रामीण 17 वर्ष मुली यात प्रथम गोंदिया सिटी तर दूरसे स्थान गोंदिया ग्रामीण. 14 वर्ष वयोगटात गोंदिया सिटी प्रथम स्थान तर दूसरे स्थान गोंदिया ग्रामीण व तीसरे स्थान आमगांव संघाला समाधानी रहावे लागले. 14 मुली मध्ये प्रथम स्थान गोंदिया, दूसरे स्थान आमगांव संघाला समाधान मानावे लागले, सर्व संघाला ट्रॉफी आणि मेडल लोकेश यादव जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आणि भविष्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या स्पर्धेचे पंच म्हणून मोनू बनकर यांनी काम पाहिले तर सूत्र संचालन मुजिब यांनी केले.