
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
निलंगा :- औराद शहाजानी येथील महाराष्ट्र विद्यालयातून दहावीच्या परीक्षेचा पेपर देऊन शाळेबाहेर थांबलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस कांही तरुणांनी गाडीतुन पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रार करताच पोलिसांनी 24 तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध ब लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभान महमंद कुरेशी, निजाम समद जामखंडे, इरफान वहीद शेख, आरीफ युसुफ पटेल, अस्लम जहाँगीर सय्यद या 5 जणांनी लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन औराद शहाजानी पोलीस ठाण्यात कलम 363, 366 अ, 34 भादंवी. सह कलम 11 (4), 12 पोक्सो अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत हे करीत आहेत.
आरोपीना निलंगा न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.