
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब यांची 131 वी जयंती सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे याचे औचित्य साधत व लक्ष वेधन्यासाठी कोकण विभाग पत्रकार संघाच्या मोखाडा शाखेच्या वतीने मोखाडा नगरपंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व नगराध्यक्षना निवेदन देऊन नगरपंचायतच्या राखीव भूखंडावर लवकरात लवकर महामानवाचे स्मारक ( पुतळा ) उभारण्यात यावा अशी मागणी नगरपंचायतकडे केली आहे यावेळी कोकण विभाग पत्रकार संघाचे मोखाडा तालुका अध्यक्ष रविंद्र साळवे उपाध्यक्ष रमेश शिंदे सदस्य अमोल टोपले अशोक धोडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.