दै. चालू वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
हात धुवा दिनाच्या संकल्पनेला धरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे हात धुण्याचे प्रात्यक्षिक स्वामी सर (विज्ञान शिक्षक)यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. मामडे सर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व पटवून सांगितले, व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित हात साबणाने स्वच्छ धुणे कसे आवश्यक आहे ते सांगीतले. त्यानंतर कला शिक्षक कर्हाळे सर यांनी विद्यार्थ्यांनी केंव्हा केंव्हा हात धुवावे ते सांगीतले. जेवणापूर्वी, जेवणानंतर, शौचाहून आल्यावर, झाडझूड केल्यानंतर, पाळीव प्राण्यांशी स्पर्श केल्यानंतर, बाहेर खेळून, फिरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक असल्याचे सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनाची प्रेरणा घेऊन पाच तास वाचन केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.