
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्यात सध्या वीजेचा तुटवडा असल्याने किमान तीन महिने राज्यात लोडशेडिंगचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहेत. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
देवेंद्र फडणवीस लोडशेडिंगबद्दल म्हणाले की, हे लोडशेडिंग राज्य सरकारने लादलेले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे लोडशेडिंग आहे. इतर ठिकाणी काँग्रेस सरकार आहे, तिथे का नाही लोडशेडिंग पण राज्यातच का आहे? हे या सरकारचे नाकर्तेपण आहे असं फडणवीस म्हणालेत.
यानंतर फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एकनाथ खडसे यांच्यावरही भाष्य करत खडसे हे निराशेतून बोलत आहेत, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट नेहमी दाखवलं जातं अस म्हणात या सरकारने लादलेलं हे लोडशेडींग आहे असा फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे शरद पवार नेमकं काय बोलले माहीत नाही असं म्हणत, अनेक पक्षांनी सुडो सेक्युलरिजम अंगीकारले आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी सेक्युलरिजम अर्थ लांगूनचालन आहे असं म्हणत शरद पवारांवर टीका केली आहे, त्यांच्या प्रमाणासहित मी ट्विट केले, तसं ट्वीट बोलके होते आणि त्यावर आलेली प्रतिक्रिया बोलकी होती त्यामुळे जास्त बोलणं योग्य नाही असं फडणवीस म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी हिंदुत्ववादी राजकारणाबाबत मोठं वक्तव्यं केलं आहे. पवार (Sharad Pawar) म्हणाले की, ज्यांच्या हातात देशाची सुत्र आहे, अशा राजकारणी, व्यक्ती टोकाची भूमिका घेत पुढे जात असेल त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन द्यावं ही भूमिका काळजी करण्यासारखी आहे. यामुळे सामाजिक ऐक्य संकटात येईल का याची चिंता मला वाटते. काहीही झालं तर महाराष्ट्र एकसंघ राहीला पाहिजे. सर्व धर्म, जाती, भाषा यांच्यामध्ये सामंजस्य असलं पाहीजे.