
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- चार ते पाच महिन्यापासून एसटी महामंडळ चे कर्मचारी संपावर असल्याने जवळपास दीडशे ते दोनशे कर्मचारी कोर्टाच्या आदेशानुसार भूम आगारात रुजू होण्यासाठी गेले असता,तेथील आगर प्रमुख आलकुंटे व डेपो मॅनेजर यांनी रुजू अर्जावर पोच पावती देण्यास नकार दिला. मात्र उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्या मध्यस्थीने हा तिढा सुटला आहे. अगर प्रमुख अलकुंटे कर्मचाऱ्यांना पोच देण्यास नकार देत असल्याने कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी भूम येथे कार्यालयात जाऊन अर्ज केला असता.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी कर्मचाऱ्यांना सल्ला देत,विभागीय नियंत्रक ताम्हणकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून चर्चा केली असता तसेच जे कर्मचारी कर्तव्यावर रुजू होण्यास तयार आहेत,त्यांना पोच देण्यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याने कर्मचाऱ्यांना सांगितले.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.