दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड जिल्ह्यातील इनामी जमिन मंदिर, मस्जिद, दर्गाह आदि प्रकरणात बनावट दस्तावेज तयार करून आधिकारात नसताना खिदमत मास जमिनी खाजगी व्यक्तिंच्या नावे आर्थिक लाभापोटी नियमबाह्यपणे हस्तांतरण करणारे रॅकेट बीड जिल्ह्यात कार्यरत असून पुढारी यांच्या वरदहस्ताने जमिनी हडप केल्याअसून प्रशासनातील तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार बीड, नरहरी शेळके आणि प्रकाश आघाव पाटील यांचा या रॅकेट मध्ये प्रत्यक्ष सहभाग असून त्यांना अटक करण्यात यावी यासाठी दि. 18 ऑक्टोबर सोमवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असून बीड जिल्ह्यातील इनाम देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात ईडीमार्फत व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.