दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
गेवराई-श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे मठाधिपती ह. भ. प. महादेव महाराज यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्या उपस्थितीत विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे नियम पाळून संपन्न झाला. यावेळी ह. भ. प. महादेव महाराज व कारखान्याचे जेष्ठ संचालक भास्कराव खरात यांच्या हस्ते बाँयलर चे विधिवत पुजन झाले. कार याप्रसंगी अमरसिंह पंडित यांनी मार्गदर्शन केले तर महादेव महाराजांनी शुभाशीर्वाद दिले.
या समारंभाला जयभवानी कारखान्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह संचालक भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे अध्यक्ष जगन पाटील काळे, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, आप्पासाहेब गव्हाणे, भारतराव पंडित, ग. प. खरात, संभाजी पवळ, गौस भाई, जाधव, संचालक श्रीराम आरगडे, शिवाजी कापसे, साहेबराव पांढरे, जगन्नाथ दिवाण, कुमारराव ढाकणे, विकास सानप, भारत पंडित, अँड. एस. एच. पाटील, बंडु मोटे, शेख मिनाज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जनरल मैनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार, ठेकेदार, उस उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.