
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
नांदेड :- नांदेड येथील युवा उद्योजक स्व.संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पंधरा ते वीस दिवस उलटूनही पोलिसांनी संजय बियाणीची हत्या करणाऱ्यांचा शोध लावला नाही. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यानी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला सांगूनसुध्दा व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनीसुद्धा पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊनही अद्यापपर्यंत संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास अजूनही पोलीस प्रशासनाकडून लागला नाही .म्हणून दिनांक 20 एप्रिल2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन व भाजप पक्षाचा एल्गार धरणे आंदोलन झाले.
यावेळी भाजप पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, तसेच नांदेड जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ साले,आ.भिमराव केराम,दिलीप भाऊ कंदकुर्ते,प्रविण पाटील चिखलीकर, संदिप छापरवाल ,संतुकराव हंबर्डे,सुनील भाऊ मोरे ,चित्ररेखा गोरे,यांच्यासह व अनेक महिलासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार साहेब म्हणाले की पंधरा ते वीस दिवस उलटूनही संजय बियाणी यांच्या हत्येचा पोलीस प्रशासन तपास लावू शकले नाहीत म्हणून ही चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करावी अशी मागणीही यावेळी केली.
या महिन्यात नांदेड शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, म्हणून बियाणी यांची ज्यांनी गोळ्या झाडून हत्या केली ,हत्या करणाऱ्यांचा शोध लावून बियाणी कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केलीआहे नांदेड जिल्ह्यामध्ये असे गुन्हे जर होत राहिले तर या जिल्ह्यामध्ये कोणताही नवीन उद्योजक निर्माण होणार नाही सध्या व्यापारी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे लवकरात लवकर संजय बियाणी यांची हत्या करण्याचा कसून शोध लावावा याबरोबरच अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत मटका, जुगार ,इत्यादी बंद व्हायला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे.
जोपर्यंत बियाणी कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत खासदार चिखलीकर साहेब हे खंबीरपणे कार्य करत राहणार आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मी सदैव तत्पर आहे, या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून खासदार प्रतापराव पाटील यांनी जनतेला ग्वाही दिली आहे . चिखलीकर साहेब हे वेळोवेळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारे नेते लोकनेते आहेत असे त्यांच्या कृतीतून सिद्ध होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.