
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यात असलेल्या गायरान जमिनीवर अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर परवानगी न घेता अनेकांनी सदरील गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन जमिन हस्तगत केली असून त्याची संपूर्ण चौकशी करून ती जमीन ताब्यात घेण्यात यावी व सदरील जमिनीवर भवितयात अतिक्रमण न होण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.तरी आज पर्यंत आपल्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही त्याची कुठलाच विचार केला नाही. संबधीत अधिकारी अर्ज कचरा कुंडीत फेकला जातो तरी आपण वरील बाबी लक्षात घेऊन भविष्यात अतिक्रमण न होण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी असे निवेदन जाधव व्यंकटी,माधव वडजे यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दिले आहे.