
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलुर उपविभागीय अधिकारी म्हणून तीन वर्षे प्रदिर्घ कालावधी नंतर शक्ती कदम यांची कोल्हापूर येथे प्रशासकीय बदली झाली याबद्दल त्यांना निरोप दिला. याप्रसंगी त्यानी देगलुर येथील कालावधीत चांगले अनुभव होता असे नमुद करुन येथील जनता सकारात्मक असल्याचे सांगितले. कोरोनाचा कालावधी, कोरोना लसीकरण यात जनतेच्या सहकार्य बदल कृतज्ञता व्यक्त केली.
नवीन उपविभागीय अधिकारी म्हणून सौ सौम्या शर्मा IAS या नी पदभार स्वीकारला आहे याबद्दल त्यांचे स्वागत केले.
त्यांनी या समयी महसूल विभाग शेतकरी यांना सेवा देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो यामुळे सकारात्मक विचार ठेवून काम करण्यासाठी सुचना केली. एखादी गोष्ट आपल्या मनाला चुकीचे वाटते तर ती चुकीचे काम परत परत होणार नाही यासाठी प्रयत्न केले जावे अशी त्यांची भुमिका असल्याचे सांगितले. याप्रसंगी तहसीलदार श्री राजाभाऊ कदम साहेब यांनी बदली हा नियम असल्याचे, पुढील कारकीर्द बाबत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम चे सुत्रसंचलन आमचे मार्गदर्शक श्री नरवाडे साहेब यांनी केले.