दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे :महापालिकेवर प्रशासक येताच अतिक्रमण नियंत्रण विभाग, आकाशचिन्ह विभाग आणि बांधकाम विभागाने अनधिकृत बांधकामे,अतिक्रमणे, तसेच नियमभंग करून उभारलेली बांधकामे काढण्यास सुरूवात केली होती. लोकांनी समाधान मानले होते. त्यानंतर धानोरी आणि डी.पी. रस्त्यावर केलेल्या कारवाईचे शहरात कौतूकही झाले. मात्र, आता या कारवाईला “सेटलमेंट” चा ब्रेक लागल्याची चर्चा आहे. अतिक्रमण कारवाईवरून अतिक्रमण नियंत्रण विभाग आणि बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून नोटीस न बजाविण्यासाठी तसेच कारवाई न करण्यासाठी शहरात जोरदार वसूली सुरू असल्याची चर्चा आहे.
या कारवाईवरून अतिक्रमण विभागाकडे बांधकाम विभाग नोटीस देत नसल्याचे सांगत आहे, तर बांधकाम विभाग अतिक्रमण विभागाच कारवाई करण्यात टाळाटाळ करते असा दोष देत एकमेकांकडे बोट दाखवितात. तर कारवाईत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही, असे वारंवार सांगणाऱ्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडूनही अतिक्रमण विरोधी कारवाई संबंधी दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. कुठेतरी पाणी मुरतेय.