दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधि- मोहन आखाडे
पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर कार्यक्षेत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई मार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा -2021 च्या विषयांकित परीक्षेचे आयोजन दिनांक 07, 08 व 09 मे 2022 रोजी सत्र-I सकाळी 09.00 ते 12.00 दुपारी 03.00 ते 05.00 या कालावधीत पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण 02 परीक्षा केंद्रावर करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहर सी.आर.पी.सी. सन 1973 क्रमांक 2/1974 चे कलम 144 (3) अन्वया परीक्षा केंद्राच्या परिसरात आदेश निर्गमित करीत आहे. असल्याचे पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी कळविले आहे.
परीक्षा उपकेंद्रापासुन 100 मीटर अंतरा पर्यंत बाहेरील आवारात परीक्षार्थी विद्यार्थी, परीक्षे संबंधी काम करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे खेरीज करुन इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. परीक्षा उपकेंद्राजवळच्या 100 मीटर परीसारातील झेरॉक्स मशीन दुकाने तसेच एस.टी.डी.,आयएसडी, पीसीओ बुथ, फॅक्स, डी.टी.पी.केंद्र व ध्वनीक्षेपके व तत्सम दुरसंचाराची साधने परीक्षाच्या दिवशी सकाळी 08.30 वा.ते दुपारी 12.00 वा.दुपारी 02.30 वा.ते सायंकाळी 05.00 वा. या कालावधीत बंद ठेवण्यात यावीत. वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.या आदेशाची अंमलबजावणीसाठी पोलीस आयुक्तालयातील अधिनस्थ सर्व परिमंडळ अधिकारी, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व इतर शाखांचे प्रभारी अधिकारी यांनी प्राधिकृत करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई मार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा-2021 एकूण दोन केंद्राच्या ठिकाणी व परीसरात दिनांक 07 मे 2022 रोजी सकाळी 07 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत फक्त परीक्षेच्या दिवशी सदरचा आदेश अंमलात राहील. असेही त्यांनी कळविले आहे.