दैनिक चालू वार्ता पंढरपूर प्रतिनिधी- सुधीर आंद
तुंगत येथील जागृत देवस्थान म्हणून या परिसरात या परिसरात ख्याती असलेल्या ग्रामदैवत जानुबाई व बिरोबा या देवांच्या यात्रेस आज पासून प्रारंभ होत आहे कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या दोन वर्षात यात्रा झाली नसल्यामुळे या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यात्रा चांगल्या पद्धतीने भरवण्यात यात्रा कमिटीने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. आज सायंकाळी श्री जानुबाई बिरोबा देवाची पालखी वाजत गाजत मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंदिरात नेली जाते रविवार आठ रोजी या यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो या दिवशी पहाटे पासून भक्त मंडळी आपले नवस फेडण्यासाठी अथवा आशीर्वाद मागण्यासाठी मंदिरापर्यंत लोटांगण दर्शन घेण्यासाठी भक्तांचा ओघ सुरू असतो देवाचा छबिना देवाचे मानकरी भक्तमंडळी नाचत आनंदात मंदिरात येत असतात तिथे सर्वांना महाप्रसादाचे वाटप केले जाते यात्रेत मंदिरात ओव्या भेदिक गाणी धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जाते व रात्री सायंकाळी ठीक सात वाजता लोकनाट्य तमाशा व सोमवारी दुपारी चार वाजता नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्याचा फड भरवण्यात येणार आहे तसेच रात्री मनोरंजनासाठी लावण्यखणी मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे . व मंगळवारी रात्री तुझ्यात जीव रंगला या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच गावात ठीक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे व सर्वत्र गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.