दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनीधी – शाम पुणेकर.
पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अनेक पालकांनी खासगी शाळेतील पटावरील आपल्या पाल्याचे नाव काढून आता महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे काम सुरू केले आहे. ही खूपच आश्चर्याची व सकारात्मक बाब आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये गुणात्मक शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शिस्त व सुविधांचा अभाव इ. गोष्टींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील पालक आपल्या मुलांना कित्येक वर्षें त्या शाळेत घालत नाही, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक भवितव्यासाठी खासगी संस्थांच्या शाळेमध्येच मुलांचा प्रवेश करण्याकडे पालकांचा कल असतो. परंतु कोरोनाच्या/ लाॅकडाऊन च्या मुळे परिस्थितीत फार मोठा बदल झाल्याने अनेक पालकांनी मुलांची खासगी शाळेतील नावे कमी करून महापालिकेच्या विविध शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेतला आहे. ह्या बाबतीत पालकांशी संवाद साधला असता त्यांनी विविध कारणे सांगीतली. प्रमुख कारण नोकरीची हमी नाही. फी परवडत नाही. पालिकेच्या शाळेतील दर्जा आता सुधारला आहे.