दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार
एकोणीस वर्षात विरोधकाला जमलं नाही ते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरचा विकास सिंगापूर सारखा करून दाखविला
बावडा तालुका इंदापूर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
बावडा परिसरातील विविध विकास कामे रक्कम 69 कोटी रुपये कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न झाला, उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे बोलतआसताना म्हणाले की इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मार्गी लावलेला 22 गावाचा प्रश्न हा माझ्या हातुन सुटला विरोधकांना सहन होईना म्हणून सोलापूरकरांची माथी भडकविण्याची कामे करत आहेत नावे ठेवण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही,शेतकऱ्यांना अडचणीत आणण्या शिवाय दुसरा धंदाच नाही छत्रपती सहकारी साखर कारखाना एखाद्या सभासदाचा साधा अर्ज आला की सभासद करून आम्ही घेतो पण या ठिकाणी मात्र वेगळेच राजकारण केले जाते नाव सहकाराचं वागणं मात्र, उसावर राजकारण करायचं त्यांना भाषणात फक्त भरणे निष्क्रिय म्हणल्या शिवाय दुसरा धंदाच नाही कोण निष्क्रिय आणि कोण सक्रिय हे जनतेला चांगलेच माहित आहे.
जातीवादाच राजकारण करायचं मशिदीवरील भोंगेचे राजकारण करून लोकांचं पोट भरणार नाही. जनतेचे प्रश्न सोडवावे लागतात नीरा नरसिंगपूरचा कृती आराखडा मी केला त्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले आहे की नीरा नरसिंपूरचा देवस्थान विकास आराखडा भरणे मामांनी केला.
,बावडा नरसिंगपूर रस्ता हा मंदिर कृती आराखड्यातून नसून ही वेगळी मंजुरी घेऊन आज काम पूर्ण केले आहे, आम्ही केलेल्या कामाचे उद्घाटन करतो दुसऱ्याने केलेल्या कामाचे उद्घाटनन आम्ही करीत नाही हे स्वार्थी राजकारण आम्ही कधीच करत नाही.
आसाही टोला त्यांनी लगावला.
जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर म्हणाले की आजची पिढी सुज्ञान आसून चांगला कोण वाईट कोण आता समजू लागले आहे. पाठी मागच्या काळातील लोक आज्ञानी होती डोळे झाकून मतदानाचा शिक्का मारत होती परंतु आज विकासावर मतदान केले जाते. तुम्ही आताआराम करावा आसाही टोला हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला.
यावेळीं प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमान कोकाटे ,श्रीमंत ढोले ,सागरबाबा मिसाळ,सुरेश शिंदे ,दीपक जाधव, विजय गायकवाड, संग्राम पाटील. गफूरभाई सय्यद, आदी मान्यवरांची उद्घाटन प्रसंगी आपले विचार मांडले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष , प्रदिप गारटकर पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे, सुरेश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष,
प्रमुख पाहुणे प्रताप पाटील, माजी सभापती, प्रशांत पाटील, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, अभिजीत तांबिले, सचिन सपकाळ, दीपक जाधव, बापुराव शेंडे, छायाताई पडसळकर, शुभम निंबाळकर, दत्तात्रय घोगरे, नरहारी काळे, चंद्रकांत सरवदे, श्रीकांत दंडवते, पांडुरंग डिसले, दादासाहेब डिसले, सोमनाथ मोहिते, श्रीकांत बोडके, हरिदास वाळेकर, सुनील जगताप, पांडुरंग बोडके, संतोष सुतार, सुदर्शन बोडके, पांडुरंग मोहिते व सर्व सन्माननीय सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य संचालक समस्त ग्रामस्थ बावडा व परिसरातील पदाधिकारी आणि मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच भागातील कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. बावडा परिसरातील सर्व विविध विकास कामाचे उद्घाटन संपन्न झाले .
सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व उद्घाटन झालेली कामे (1) बावडा नरसिंहपूर रस्ता लोकार्पण 57 कोटी रुपये (2) बावडा ते गणेशवाडी रोड चौपदरीकरण 4 कोटी रुपये (3) बावडा ते भांडगाव रस्त्यावरील पूल 3 कोटी रुपये.(4) बावडा ते गणेशवाडी ते गारअकोले रस्ता 2 कोटी रुपये (5) तसेच इतर सर्व 3 कोटी रुपयांची विविध विकास कामे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केले.