दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील खडीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने व सरपंच श्रीकांत बोडके यांच्या पाठ पुराव्यामुळे मिळालेल्या निधीतून खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बाळासाहेब सुतार, ठेकेदार प्रतीक सुतार, पिंपरी बुद्रुक गावचे उपसरपंच पांडुरंग बोडके यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करून काम चालू करण्यात आले .तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उपसरपंच पांडुरंग बोडके, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, चेअरमन सुदर्शन बोडके, प्रवीण बोडके, मारुती सुतार, भाग्यवंत बोडके, वैभव गायकवाड, आतुल बोडके, संजय गायकवाड, शंकर रनदिवे, मयुर चौगुले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.