दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:
देगलूर पोलिसांचे लक्ष गेल्या तीन महिन्यांपासून वाळू व्यवसायाच्या मिळकतीकडे लागल्याने शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वीच एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाल्याची चर्चा असून पोलीस खात्याची बदनामी होवू नये यासाठी गुन्हा न नोंदविता तपास चालू असल्याची चर्चा शहरात व पोलीस ठाण्यातच होत आहे.
तीन महिन्यापासून वाळू ठेक्याचा लिलाव होवून वाळूचे उपसा व वाहतूक चालू झाल्याने पोलिसांचे लक्ष रात्रभर रेतीच्या दोन दिवसापूर्वी जुन्या बसस्थानक परिसरात असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली. मात्र या चोरी
ट्रककडेच लागून आहे. शहरात रात्री गस्तीवर असणारे पोलीस सुध्दा गावाच्या बाहेर जावून रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून आपली पोळी भाजून घेत आहेत. शहरात एक दिवसा आड चोरी होत आहे. मात्र पोलिस चोरीची तक्रार देणाऱ्यांचीच उलट चौकशी करून चर्चा चालू आहे. त्यांना भंडावून सोडत असल्याने देगलूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दडपण्याचे प्रकार वाढले आहेत.
प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला नाही. यामुळे पोलीस खात्याचीच बदनामी होईल म्हणून कोणताही स पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी याबद्दल बोलायला तयार नाही. ग्र मात्र या प्रकरणी शहरात व पोलीस ठाण्यात मात्र दबक्या आवाजात
१२ दिवसापूर्वी नाथनगर भागातील रहिवासी विवेक शिंदे यांच्या घरी चोरी होवून जवळपास २ लाख रुपयाचे लहान बाळाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी सुध्दा केली मात्र तक्रार नोंदविण्याचे टाळले. दागिन्याच्या पावत्या आहेत का? ते असले तरच तक्रार नोंदविता येते अशी भूमिका पोलिसांनी घेतली. विशेष म्हणजे घरात मुलगी जन्मल्यापासून ते तिचा पाळणा होईपर्यंत अनेक नातलग एक दोन ग्रामची अंगठी घालतात. त्यामुळे विवेक शिंदे यांच्या घरी अंदाजे २ लाख रुपयाच्या अंगठ्या व दागिने चोरी होवून सुध्दा त्यांच्या चोरीची तक्रार पोलिसांनी नोंदविली नाही. ३१ मे रोजी महामार्गावरील शासकीय विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या एका सिमेंट दुकानात व एका हार्डवेअर दुकानात चोरट्यांनी पत्रा कापून चोरी केली. तसेच त्याच रात्री गोकुळनगर भागातील ३ भुसार दुकान चोरट्यांनी फोडले. दर दिवसाआड शहरात रात्री चोरी होत आहे. पोलिसांच्या उलटतपासणीमुळे अनेकांनी चोरी होवून सुध्दा चोरीची तक्रार देण्याचे टाळत आहेत. मात्र जे तक्रार नोंदविण्यासाठी जातात, त्यांना अनेक प्रश्नाचा भडीमार पोलीस करत असल्याने देगलूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे ८० टक्के दाखल केल्या जात नाहीत. ज्या घराला रात्री कुलूप ते घर रात्री चोरट्यांनी फोडले असे समीकरण शहरात झाले आहे. चोरीचे जे नाममात्र गुन्हे दाखल होतात, त्या चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना फारसे यश येत नाही. एकंदरीत शहरात चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या एकुण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत.