दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पिंपळदरी :- लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व बहूजन समाजासाठी स्वराज निर्माण केले. त्या स्वराज्याचे पहिला राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून रोजी पार पडला. त्याचे औचित्य साधून संपूर्ण भारतभर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. पिंपळदरी येथे श्री. संतोष पाटील जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार संतोष पाटील यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक, लहान थोर मंडळी उपस्थित होते . मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा करुन छत्रपती शिवाजी महाराजांना केले अभिवादन.