दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी.
कोरेगांव विधानसभा मतदारसंघात असलेल्या कोयना,धोम व कणहनेर प्रकल्पबधितांचे प्रश्न तातडीने सोडवले जातील विलंब होणार नाही प्रशासकीय पातळीवर आवश्यकता भासल्यांस त्यासांठी विशेष बैठक बोलवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी विधानसभा मतदार संघातील प्रकल्प बंधितांच्या प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी सातारा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलवडे उपस्थिंत होते आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रकल्पबाधितांचे प्रलंबित असलेले विषय त्यावर अपेक्षित असलेली कारवाई आदी विषयांवर चर्चा झाली. कोरेगाव मधील पाणी प्रश्नंनावरही आ. शिंदे यांनी लक्ष वेधले यावेळी जिल्हा प्रशासनाकडूंन सर्वतोपरी सहकार्य केले जाईल व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रलंबीत विषयी लवकरात लवकर मार्गी लावले जातील असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले