दैनिक चालु वार्ता
धुळे प्रतिनिधि
सोपान देसले
धुळे धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक १७ जागांच्या निवडणुकींतर्गत आतापर्यंत तीस इच्छुक उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले. त्यात सोमवारी (ता.१८) ४७ अर्ज दाखल झाले होते धुळे जिल्ह्यातून ३२, तर नंदुरबार जिल्ह्यातून १८ अर्ज दाखल झाले. यातही चौदा उमेदवारांनी २५ अर्ज दाखल केले आहेत. या प्रक्रियेत आजी-माजी आमदार, संचालकांचाही समावेश आहे. ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनलद्वारे बिनविरोध करण्याचे नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत माघारीवेळी चित्र स्पष्ट होऊएकूण अर्जांची स्थिती सुरवातीचे तीन अर्ज वगळता सोमवारी निर्धारित वेळेत आजी- माजी आमदार, संचालकांसह एकूण ४७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध राजकीय पक्ष, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींमधून काहींनी दोन, तीन, तर काहींनी चार अर्ज दाखल केले. त्यानुसार आतापर्यंत तीस उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बँकेच्या येथील मुख्य कार्यालयातील निवडणूक कक्षात सोमवारी प्रामुख्याने धुळे जिल्ह्य बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सुरेश रामराव पाटील, श्यामकांत सनेर, अनिकेत पाटील, प्रभाकर चव्हाण, हर्षवर्धन दहिते, डॉ. दरबारसिंग गिरासे, डॉ. एस. टी. पाटील, भगवान पाटील, तर नंदुरबार जिल्ह्यातून आमदार शिरीष नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, दीपक पाटील, आमशा पाडवी, भरत माळी यांच्यासह अन्य इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध होण्यापूर्वी प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी समर्थकांसह पात्र लोकप्रतिनिधींना अर्ज दाखल करण्याची सूचना दिली आहे.