
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
जगातील सर्वात उंच शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील गिर्यारोहक अनिल वसावे याची निवड झाली आहे.
एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे याच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम दिनांक 07 एप्रिल 2023 ते 07 जुन 2023 या कालावधीत फतेह होणार आहे.अक्कलकुवा सारख्या अतिदुर्गम भागातील बालाघाट या छोट्याशा गावातील अनिल वसावे या युवकाने आतापर्यंत अफ्रिका खंडांतील सर्वात उंच शिखर ( Kilimanjaro),युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट एलबुर्स व एव्हरेस्ट बेस कॅम्प आदी आंतरराष्ट्रीय मोहीमा फतेह केल्या आहेत.अशी आंतरराष्ट्रीय कामगिरी करणारा अनिल वसावे हा पहिला आदिवासीं युवक आहे.त्याने नुकतेच द.अमेरीकेतील सर्वात उंच शिखर माऊंट एकांकगुवा हे शिखर सर केले आहे आणि लगेच तो एव्हरेस्टवीर होण्यासाठी प्रयत्नशील आहे.अनिल वसावेने अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केले आहेत.अनिल वसावे पुन्हा जगातील एका सर्वोच्च नवीन कामगिरीसाठी सज्ज झाला असुन जगातील सर्वात उंच शिखर सर करुन गौरवास्पद कामगीरी करणार आहे.
अनिल वसावे या गिर्यारोहकाला माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी एकुण सुमारे 35 लाख रुपयांचा खर्च येणार आहे त्यामुळे या गरीब होतकरु गिर्यारोहकाला समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ,कंपनी ,संस्था ,शासन यांच्या कडुन आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.या आधी
अनिल वसावे ला आंतरराष्ट्रीय कामगिरी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने भरीव मदत केली होती.या वेळी देखील आदिवासी विकास विभागाने मिशन शौर्य अंतर्गत मदत करावी यासाठी पालकमंत्री ना के.सी.पाडवी यांनी पुढाकार घ्यावा तसेच केंद्र सरकारने देखील या होतकरु युवकाला आर्थिक मदत करावी अशी माफक अपेक्षा जिल्हा वासियांची आहे.