
दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनिधी- रमेश राठोड
अहमदपूर:- अहमदपूर शहरातील शिवाजीनगर थोडगा रोड येथील एका प्रवेश द्वारादलसमोर थांबविण्यात आलेली मोटारसायकल अज्ञान चोरट्यांनी पाळवण्याची घटना दि : ८ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली या बाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी उद्धव नारायण पवार वय ४२ वर्ष रा. हावरगा ता . जळकोट यांची मोटारसायकल ( एम.एच २४ बी.एफ ७९३२) एका प्रवेश द्वारासमोरून थांबलेली होती. दरम्यान ती अज्ञान चोरट्यांनी पळवली याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात अहमदपूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दि २३/०६/२०२२ पर्यंत आणखी अहमदपूर पोलीस ठाण्यात दखल घेतली नाही
उद्धव पवार हे पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यास गेल्यानंतर त्या व्यक्तीस तपास चालू आहे म्हणून पत्ता लागल्यास आम्ही तुम्हाला कळवू म्हणून सांगत आहेत अशी माहिती उद्धव नारायण पवार यांनी दिली