
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 23/6/2022 रोजी कृषी महाविद्यालय डोंगर शेळकी तांडा उदगीर च्या वतीने अंतीम वर्षांत शिकत असलेले विद्यार्थी साळुंके आर. व्ही, रूपनर आर. व्ही, राठोड आशिष, राठोड नितीन, साळुंके आकाश, सय्यद फरकोदीन, माळी थारन या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपयोग विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व वर्षा श्रीमंगले तसेच साळुंके आर. व्ही, रूपनर आर. व्ही, राठोड आशिष, राठोड नितीन, साळुंके आकाश, सय्यद फरकोदीन, माळी व शाळेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.