
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी माकणी प्रतिनिधी-गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी; लोहारा तालुक्यातील माकणी येथे दि 26-6-2022 रोजी भारत शिक्षण संस्थेचे कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माकणी ता.लोहारा -बहुजन उद्धारक , लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. २६ जुन हा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिवस ‘ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.कुस्ती ला राजाश्रय देणारा, भारतीय कुस्ती अटकेपार नेणारा राजश्री शाहू महाराज
महाविद्यालयाच्या या कार्यक्रमासाठी क्रीडा विभाग प्रमुख डॉ.ए.सी.पाटील , प्राणीशास्त्र प्रमुख डॉ.एस .आर .बिराजदार , डॉ. डी. एस. बिराजदार , डॉ.मोरे .आळंगे , देशमुख, साळुंखे, इंगळे, वाघमारे, जाधव, इत्यादींनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता