
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा: दि.२७.भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहिर केली आहे. या योजनेमुळे देशातील तरूणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, संपूर्ण देशभर अग्निपथच्या विरोधात आज दिनांक २७/०६/२०२२ रोजी नांदुरा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा विषय अतिशय गांभिर्याने घेतला असून मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून मा.श्री.राहुलजी बोंद्रे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमेटी यांच्या मार्गदशनात व मा.श्री.राजेशभाऊ एकडे यांचे नेतृत्वात सोमवार, दि. २७ जून २०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन पार पडले.
सदर धरणे आंदोलनात दु.१:०० वा. मा.जिल्हाधिकारी यांना नांदुरा तहसिल मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष श्री.भगवान धांडे यांनी केंद्र सरकारच्या या योजनेची तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी मलकापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेशभाऊ एकडे व नांदुरा शहर व तालुका काँग्रेस कमिटीचे मा.श्री.भगवान धांडे,मा.श्री.निलेश पाऊलझगडे, जिल्हा सरचिटणीस, मा.श्री पद्मराव पाटील मुख्य प्रशासक कृऊबास नांदुरा, मा.श्री पुरुषोत्तम झालटे, जिल्हा पुनर्वसन समिती सदस्य, ॲड.मोतेशाम रजा, श्री.प्रसाद पाटील, श्री.ज्ञानेश्वर डांबरे यु.कॉ.तालुका अध्यक्ष, सौ.आशाताई प्रकाश गोंड, सौ.सुनिता देशमुख,सौ.जयश्री बोर्डे, श्री.केशव मापारी तालुका अध्यक्ष सं.गां.नि.यो.,श्री.गजानन गव्हाळे,प्रशांत देशमुख,राजेद्र वानखडे, श्री.कैलास वानखडे, श्री.शंकर बोदडे, श्री.विनलकुमार मिरगे, श्री.शशिकांत गव्हाळ, श्री.शिवा मानकर, श्री.महेंद्र देशमुख, श्री.अनंता कंठाळे, शेख गप्फार शेख गनी, श्री.मिलींद मोरे, श्री. श्रावन घुळे,श्री.सुशिल वाकोडे, जयसेन सरदार, श्री.कैलास नामगे, श्री.निंबाजी हेरोडे, श्री.रमेश देशमुख,श्री.दत्ता गायगोळ, श्री.मोहनसिंग चव्हाण, श्री.सुपडा भगत, श्री.ज्ञानेश्वर घोंगे, हे सर्व प्रामुख्याने उपस्थित होते.