
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी माकणी-गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी:लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे दि 25-6-2022 रोजी एसएससी बोर्ड परीक्षा 2022 मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव ‘साठे कोचिंग क्लासेस्’ च्या वतीने करण्यात आला. त्यासाठी “भुंगारी गावच्या भानगडी” या वेब सिरीजचे आण्णासाहेब कदम, शिवराज कदम, संतोष भारती, दत्तात्रय डोकडे, श्याम कदम आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनील (आबा) साळुंके, पोलीस पाटील बालाजी मातोळे, सचिन घोगे, कृष्णात साठे, क्लासेसचे संचालक किरण साठे (किरण सर) व सर्व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुनील (आबा)साळुंके होते.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते कु. गोरे श्वेता रामदास व कु. साळुंके सुहानी शिवाजी या दोन विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.