
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. बुधवारीप्राप्त झालेल्या २६५ अहवालापैकी नांदेड महापालिका हद्दीत १६ तर नांदेड ग्रामीणमध्ये दोन असे एकूण १८ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. मंगळवारी देखील नांदेड महापालिका हद्दीत पाच तर नांदेड ग्रामीणमध्ये एक असे एकूण सहा अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के आहे.जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ८८४ एवढी झाली असून यातील एक लाख १५३ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ३९ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन गृहविलगीकरणातील तीन रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरणात तीन, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरणात ३३, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी तीन असे एकुण ३९ व्यक्ती उपचार घेत आहेत.
हजार ६९२ एवढी आहे.