
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील आष्टा येथे श्री संत मुक्ताबाई पालखीचे आगमन होणार आहे.आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात.उद्योजक बापू शेठ घोलप, ग्रामपंचायत कार्यालय आष्टा,सरपंच सुनिल जाधव ,उपसरपंच सौ.अर्चना संभाजी नलवडे, ग्रामसेवक केंद्र. एस.बी. ,श्री तात्यासाहेब आष्टेकर, रवींद्र वाघमारे,श्री शिवाजी घोडके , श्रीमती सुजाता पाटील, सौ प्रतिभा गिलबिले, सौ द्रौपदी माळी, सौ प्रिया जगताप, समस्त आष्टा ग्रामस्थ यांनी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.