
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माळावरील पाण्याच्या टाकीची साफसफाई लोहा न.पा. च्या वतीने काम सुरू असून किरण च्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम चालू आहे.
लोहा शहरातील नागरिकांना लोहा न.पा. च्या वतीने न.पा. च्या पाणी पुरवठा सुरू आहे शहरात कुठेही पाणी टंचाई जाणवत नाही.
लोहा शहरात लोहा न.पा. च्या वतीने साफसफाई स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबती या सहित विविध विकास कामे सुरू आहेत.
लोहा शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, उपाध्यक्ष दत्ता वाले व प्रत्येक प्रभागातील नगरसेवक लोहा न.पा. प्रशासनाशी समन्वय साधून आहेत. लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे , कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड , पाणी पुरवठा विभागाचे अभियंता चौडेकर, स्वच्छता व दिवाबती विभागाचे रावसाहेब नळगे, आदी उत्कृष्ट कामगिरी करीत असुन लोहा शहराला सांडपाण्यासाठी सुनेगाव तलावातून शिक्षक काँलनीच्या पाठी मागील माळरानावरील मोठ्या टाकीतून पाणी पुरवठा बिलचींग पावडर टाकून फिल्टर करून सोडले जाते . मागील तीन वर्षांपासून पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे तसेच लोहा न.पा. च्या सर्व बोअरला ही पाणी भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे लोहा शहरात गेल्या तीन वर्षांत कधीही पाणी टंचाई निर्माण झाली नाही. सध्या लोहा न.पा. च्या माळावरील मोठ्या पाण्यच्या टाकीचे साफसफाई गाळ उपसा व स्वच्छता व फिल्टर चे काम सुरू आहे या कामाची स्वता पाहानी करताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे सर माझी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार गटनेते करीम शेख नगरसेवक अमोल व्येव्हारे नगरसेवक संदीप दमकोडावांर नगरसेवक नबी शेख कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड अभियंता श्रीहरी चोडेकर आदी उपस्थित होते त्यामुळे लोहा शहरातील नागरिकांना लोहा न.पा.च्या वतीने स्वच्छ व फिल्टर पाणी उपलब्ध होईल .