
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे: तशी बातमी द्यायची नव्हती परंतु नाविलाजास्तव लिहितो आहे.
मागच्या वेळी संपादक साहेबांनी अतिशय गंभीररित्या व चांगल्या प्रकारे. फेसबुक लाईव्ह द्वारे गरीब कुटुंबीयांना रुग्णालय प्रशासनाचा नाहक त्रास सहन करावा लागला. या कुटुंबाला मानहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर करावी लागले. याची आपण सर्वजण साक्षीदार आहात.
असो पण पुन्हा पुन्हा तशाच प्रकारच्या घटना घडत असतात. हे आपण नेहमी विविध वृत्तमानप्रत्राद्वारे वाचतो. त्यामुळे प्रशासन कधी जागे होईल हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये पडतो ?
मी काही आरोग्य विषयक आजार पणामुळे तात्काळ प्रथमच ऍडमिट व्हावे लागले माझ्या आरोग्यविषयक सांगायचे झाल्यास मला शक्य तो योग्य उपचार मिळाला. आणि तो चालू आहे.
उपचार घेत असताना मला जो अनुभव मिळेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
बाजूला एका वार्ड नंबर 12 काॅट नंबर तीन कॉटवर एक पेशंट रात्रभर मानवलेला लाजीरवाने आक्रोश काढून खूप मोठ्याने मला वाचवा खूप त्रास होतो खूप इजा होते हो! त्याने म्हणून मी कोणाला रात्र रात्रभर झोपू दिले ना स्वतःला झोपला. अक्षरशः रात्रभर बेंबीच्या देठापासून खूप मोठ्या किंचाळ्या टाकत होता. शेवटी दिवस निघायला सकाळी सहा वाजता त्रास सहन होत नव्हता त्याने लावलेल्या स्लाईन ( आय. व्ही.)
च्या पाईपने गळा आवळून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. पण प्रसंग अवधान आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्या पेशंटच्या हातातून पाईप हिसकावून घेतला. त्यामुळे ही घटना टळली. आणि हा सारा प्रकार रात्रभर संबंधित रुग्णालय अधिकारी व संबंधित कर्मचारी उघड्या डोळ्यांनी बघत होता. पण सरळ डोळेझाक करीत होते.
या सर्व घटना पाहता कधी रूग्णालय प्रशासकीय व्यवथा जागी होईल देव जाणे.