
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा : – दि 1 जुलै 2022 रोजी जि. प. प्रा. शा.पांगरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कृषी दिन साजरा करण्यात आला. ओली माती व बिया वापरून प्रति विद्यार्थी 10 याप्रमाणे सीड बॉल तयार करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगण्यात आले. हे सीड बॉल वापरून विद्यार्थ्यांनी रिकाम्या जागेत, शाळेच्या परिसरात व त्यांच्या शेतात लागवड करून त्या रोपांचे संवर्धन करण्याचे आव्हान शाळेचे मुख्याध्यापक श्री एम. डी. बटलवाड सर यांनी केले.
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भरत पवार, उपाध्यक्ष, सदस्य ,पालक, सहशिक्षक श्री गोंड ए बी, सौ श्रीमंगले आर डब्ल्यू उपस्थित होते.