
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, नांदेड अंतर्गत ललित कला भवन, नांदेड येथे गटस्तरीय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६९ वा वर्धापन दिन उत्सहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करन्यात आले. तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवर मा. श्री. शिवाजीराव धर्माधिकारी (माजी मंडळ सदस्य), मा. श्री.एखनाथ मामडे साहेब (माजी मंडळ सदस्य) व श्री. केशवराव देशमुख (गुणवंंत कामगार पुरस्कार प्राप्त) व श्री. अँँड. सतीश राउतखेडकर (जय खंडेराया संगीत मंच, नांदेड) या मान्यवराचे व उपस्थित सर्व कामगार, कामागर कुंंठूंंबिंंय व इतरांचे पुष्प गुच्छ, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मध्ये प्रसाद धस कामगार कल्यान अधिकारी यांनी मंडळाच्या १ जुलै १९५३ ते १ जुलै २०२२ या कालावधित मंडळाने केलेल्या कार्याची थोडक्यात रुपरेशा माडली. तसेच मंडळाचे माजी मंडळ सदस्य मा. शिवाजीरा धर्माधिकारी व मा. एकनाथ मामडे साहेब यांनी मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यानंतर जय खंडेराय संगीत मंच, नांदेड यांनी बहारदार संगीत गायनाची मेजवानी सादर करून उपस्थितांची मने जिकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद धस सर कामगार कल्याण आधिकारी गट नांदेड यांनी केले, सूत्रसंचालन व्हि.एन. साखरे सर यांनी केले तर आभार ग.सु. भोसीकर यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता संयोजक विलास मेंडके सह केन्द्र संचालक,शेषराव फालके, .व्ही बी स्वामी देगलूर,साईनाथ राठोड, हनुमान संवडकर ,नागेश कल्याणकर, सौ. मनिषा काळे, सौ मंदा कोकरे, श्रीमती अरूना गिरी श्री. नामदेव तायडे, सौ.उषा गवई गटातील स्थानिक कर्मचारी यांंनी प्रयत्न केले.