दैनिक चालु वार्ता म्हसावद सर्कल प्रतिनिधी -सुनिल पाटिल
म्हसावद प्रतिनिधी – नागझिरी ग्रुप ग्रामपंचायत मधील नागझिरी , साबलापाणी , उमरापाणी , उकलापाणी , अंधारपाडा , बुरीनमाळ , इत्यादी गावातून विद्यार्थी म्हसावद / लोणखेडा असे बाहेर गावी शिक्षण घेण्यासाठी जात असतात व ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला येण्या जाण्या साठी खाजगी वाहनाचा वापर करावा लागत होता . महाराष्ट्र राज्य परिवहन ची बस ही सध्या राणीपूर मुक्काम सुरू होती नागझिरी ग्रामस्थांनी ह्या बसची मागणी नागझिरी पावत व्हावी म्हणून ग्रुप ग्रामपंचायत नागझिरी येथून शहादा आगार प्रमुख श्री योगेश लिंगायत साहेब व स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी साहेब यांना निवेदन दिले असता साहेबांनी ह्या बस च्या पूर्ण फेऱ्या नागझिरी पावत करीत ग्रामस्थ व विद्यार्थी यांची मागणी पूर्ण केली व रुट बोर्ड लावून बस ची पूजा करीत बस नागझिरी येथे सुरू केली ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी , ग्रुप ग्रामपंचायत च्या वतीने आगार प्रमुख श्री लिंगायत साहेब , स्थानक प्रमुख श्री कुलकर्णी साहेब , व राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले श्री नाथा भिल सरपंच नागझिरी यांनी चालक वाहक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व ग्रामस्थांनी आनंद वेक्त केला .