दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””“”””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : तालुक्यातील करडगांव-हिंगला येथील पूल व बंधा-याचे लोकार्पण परभणी विधानसभा शिवसेनेचे आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या हस्ते झाले.
सुमारे सात कोटी रुपयांची लागत लावून बनला गेलेला हा पूल व बंधारा नांदखेडा, करडगांव, सिंगला, सनपूरी, वाडी, दमयी, मिर्झापूर, साडेगाव, जरी, सावंगी, आपेगाव, दूधगाव, आदी गावातील व लगतच्या सर्व परिसरातील ग्रामस्थांना रहदारी व वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा पूल व बंधारा ठरला जाणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आ. राहूल पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून पूर्णत्वास गेल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले. आमदारकीच्या माध्यामातून परभणीचे पालकत्व स्वीकारलेल्या राहूल पाटील यांनी विविध लोकोपयोगी कामांची पूर्तता तर केली आहेच त्याशिवाय असंख्य अशा प्रलंबित कामाबरोबरच मोठमोठ्या नवीन प्रकल्पांना ही मंजूरी मिळवून समस्त परभणी करांचे हित साधले आहे. त्यांच्या संकल्पनेतून भविष्यातही परभणी विधानसभा मतदारसंघात अनेक योजना राबविल्या जाणार असल्याचे समजते. “साथ जनतेची-साधना विकासाची” हेच सूत्र अंगिकारलेल्या राहूल पाटील यांच्यासारखे कर्मठ, लोकहितवादी आणि निस्वार्थी नेतेच परभणीच्या सर्वांगीण विकास करु शकतील यात तिळमात्र शंका नसावी असा विश्वासही जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. परभणी-पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाचे गत वैभव पुन्हा मिळावे यासाठीही आ. राहूल पाटील, खासदार संजय जाधव या दोन्ही शिवसेना नेत्यांनी अथक प्रयत्न करावेत अशी केवळ अपेक्षाच नव्हे तर खात्री असल्याचे मत पूर्णा व परभणीकरांनी व्यक्त करणे स्वाभाविक आहे.
या प्रसंगी सदाशिव देशमुख, किशोर देशमुख, सुशील देशमुख, नंदू अवचार, सोपान अवचार, अरविंद बोबडे, दिनेश बोबडे यांच्यासह असंख्य महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.