दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी जालना-आकाश माने
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा भोकरदनचे आमदार संतोष दानवे आणि जालना बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन भास्कर दानवे यांनी अर्जुन खोतकर यांचा मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व राज्यशासनाला समर्थन दिल्याबद्दल त्यांचा चिञकुट निवासस्थानी सत्कार केला. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हापरिषदेचे मा. उपाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, शालिकराम मस्के, गणेश फुके, नगरसेवक लक्ष्मीकांत पांगारकर, भारतीय जनता पार्टीचे शहरध्यक्ष राजेश राऊत, शिवसेनेचे उपजिलहाप्रमुख पंडीत भुतेकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, प्रतीक दानवे, संजय देठे, वसंत जगताप, रवी अग्रवाल, धनू काबलिये, वसंत शिंदे आदी दिसत आहे.