दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परभणी जिल्ह्यात ३,४ व ५ ऑगस्ट रोजी वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह काही अपवाद वगळता मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार ४ व ५ ऑगस्ट रोजी मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात वादळी वारा, मेघ गर्जना आणि वाल्याचा वेग ताशी ३० ते ४० कि.मी. यासह किंचित ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून ६ ऑगष्ट रोजी नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही ताशी ३० ते ४० कि.मी. या वेगाने वारे वाहिले जाणार असून मेघ गर्जनेसह पाऊस कोसळणार असल्याच्या शक्यतेचा अंदाज परभणी कृषी विद्यापीठ हवामान खात्याकडून मुंबई केंद्राच्या वतीने सांगितले आहे. त्यामुळे परभणी, नांदेड, हिंगोली सह संपूर्ण मराठवाड्यातील जनतेने यांची नोंद घेणे आवश्यक आहे.