दैनिक चालू वार्ता खानापुर सर्कल प्रतिनीधी- मानिक सुर्यवंशी
अटकळी येथील किशोर माध्यमिक विद्यालयात ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ सचिव ज्यांची ख्याती उपक्रमशील प्राचार्य म्हणून आहे गुणवत्ता विकासासाठी परिसरात अहोरात्र प्रयत्न करणारे प्राचार्य श्री संजय पाटील शेळगावकर यांचा 49वा वाढदिवस 49 वृक्ष लाऊन व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करून साजरा करण्यात आला व तसेच शाळेतील विद्यार्थी अविनाश पोलकमवाड व प्रतिभा कुर्णपल्ले यांचा पण वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री अटकळे सर यांनी तुम्ही आम्हाला विद्यार्थि नियमित पाठवा आणि तुम्हाला गुणवत्ता देऊ असे आश्वासन दिले, शाळेमध्ये कोण कोणते उपक्रम चालतात त्यांची सखोल अशी माहिती दिली व पुढे गुणवत्ता विकासासाठी सहकार्य करण्याची सर्वांना विनंती केली यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हादरावजी मुंडकर यांनी आतापर्यंत आपल्या शाळेला मदत केली यापुढे करणार असल्याचे आश्वासन दिले उपसरपंच श्री डोंगरे सर यांनी जिल्हा परिषद शाळा व किशोर विद्यालय यामध्ये आम्ही मतभेद न करता दोन्ही शाळेत गुणवत्ता विकास कसा होईल यासाठी आम्ही सर्व गावकरी सहकार्य करतो असे सांगितले या कार्यक्रमाला गावातील प्रमुख टाकळी चे सरपंच श्री मारुतीराव हेंटे, माजी चेअरमन शंकरराव डोंगरे, भगवानराव पाटील जाधव, उपसरपंच श्री रणवीर डोंगरे चेअरमन बजरंग बत्तलवाड, माधवराव बोंगळे, गुणवंतराव पाटील जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजेश पोलकमवाड,सुधीर वाघमारे, बळी पाटील, आयुब शेख, व तसेच विद्यालयातील कर्मचारी श्री पेंटे सर, मोरे सर, कच्छवे सर, विभुते सर,शेटकर सर ,गव्हाणे सर, कन्शेट्टे सर, बैस सर, बसवदे सर, व गावातील आदी मंडळी उपस्थित होती सूत्रसंचालन व आभार श्री शेटकर सर यांनी केले