दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वामनराव कराळे
————————-
परभणी : वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात सर्वत्र जोमाने शोध मोहीम सुरू केली आहे. त्याचाच परिपाक म्हणून तब्बल आठ दुचाकी वाहने पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत आरोपींच्याही मुसक्या आवळल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील धार रोड, वांगी रोड भागात काही अज्ञात वाहने बाहेरुन चोरुन आणल्याची खबर वाहतूक पोलिसांना लागली होती.
त्याच अनुषंगाने पाळत ठेऊन पोलिसांनी तशी तब्बल आठ अनोळखी वाहने शिताफीने ताब्यात घेतली.
वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन भिगेवाड यांच्या नेतृत्वाखाली पो. कर्मचारी शेख मुख्तार, अजय भराडे, अविनाश शिंदे, शेख, कांबळे या पथकाने सापळा रचून जी दूचाकी वाहने पकडली आहेत ती नांदेड, औरंगाबाद, मुंबई, पुणे, परभणी आदी भागातली असल्याचे समजले असून त्याची खबर संबंधित पोलीस ठाण्याला ही दिल्याचे समजते.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील भूरट्या चोरांचे धाबे पूरते दणाणल्याचे समजते. शहरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
—————————————-
परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने बस स्थानक भागातून फिरणारे तीन जणांचा खात्रीशीर संशय आल्याने त्यांच्यावर झडप घालून पकडण्यात यश मिळविल तर एका चोरी प्रकरणी कुर्बान आली शहा नगरातून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गंभीर व भूरटे गुन्हे करुन शहराच्या विविध भागात, गल्ली बोळांचा आधार घेत दडून बसलेल्या अशा अनेक आरोपींना आता पूर्ती धडकी भरली असल्याचे
बोलले जात आहे.