दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
लातुर मा जिल्हा अधिकारी साहेब यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह,ट्राॅफी व प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आले
1 ऑगस्ट या महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आज मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते नळेगाव सज्जाचे तलाठी अविनाश पवार यांना उत्कृष्ठ तलाठी हा पुरस्कार मिळाला.
शासनाचा महत्त्वकांशी ई पीक पाहणी प्रकल्पात नळेगाव सज्जातील हटकरवाडी हे गाव तालुक्यातील पहिले 100 टक्के काम पूर्ण झालेले गाव ठरले.
ई चावडी या शासनाच्या अजून एका महत्वाच्या प्रकल्पात संपूर्ण जिल्ह्यातून हटकरवाडी या गावची निवड झाली असून या गावचे ई चावडीचे कामही पूर्ण झाले आहे.
Youtube चॅनल च्या माध्यमातून ई पीक पाहणी, Crop Insurance व इतर शेतकरी उपयोगी व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे.
नळेगाव मधील 40 ते 50 वर्षापासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न सामोपचाराने मिटवला, एक झाड लावा, सातबारा आठ अ मोफत मिळवा असे उपक्रम राबविले, कोरोना कालावधीत मोबाईलवर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध करून दिला तसेच Anti Corona Force ची यशस्वी अंमलबजावणी असेल ई कामे केली.यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल साहेब, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे साहेब, निवासी जिल्हाधिकारी ढगे साहेब, जिल्हा पुरवठा अधिकारी पडदूने साहेब, जिल्हातील सर्व उपविभागाचे उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्याचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.