दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी जळगांव- संभाजी गोसावी
आपल्या आईने दिलेली संस्कारांची शिदोरी आपण आपल्या मुलांना देतो म्हणूनच पिढ्या घडतात. एका आईमुळे कुटुंब घडते आणि कुटुंबामध्ये समाज हेच उत्तम संस्कार साधी, राहणी उच्च विचारांचे धडे मला आईकडूंन मिळाले प्रत्येक घरांत मुलांना घडविण्यांचे काम आई, वडील करतात परंतु आईचा वाटा हा मोठा असतो मला देखील यशाच्या वाटेवर माझी आई कमल व्यंकटेशराव मुंढे हिनेच नेले माझ्या आईचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत झाले वडील मात्र शिक्षक असल्यांने घरांतील वातावरण अतिशय शिस्तप्रिय आणि संस्कारांचे होते. अभ्यासांचे व मेहनतीचे बाळकडू मिळाले माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा माझ्या आईनेच केला ती दररोज मला बाराखडी पाढे,सुंदर हस्ताक्षर याबाबत मार्गदर्शन करायची. साधारणपणे इयत्ता तिसरी ते चौथीपर्यंतचा अभ्यास ती घेऊ शकली. मी बालपणापासून शिक्षण घेऊन मोठे व्हावे अशी तिची इच्छा होती. आईनेच मला अभ्यासाची सवय लावून माझ्या शिक्षणांचा पाया पक्का केला. शिष्यवृत्ती,परीक्षेसाठी प्रोत्साहिंत केले आपल्या जवळच्या कमीत कमी संसाधनांत आपण कसे उत्तम प्रकारे जगले पाहिजे इतरांना मदत केली पाहिजे साधे राहणे, उच्च विचार मेहनत व कष्टांची तयारी याप्रमाणे तिने जगायला वागायला शिकवले. माझी आई माझ्या निर्णयामागे खंबीरपणे उभी होती आईच्या याच ठाम भूमिकेमुळे वडिलांनी देखील माझ्या निर्णयांला संमती दिली. त्यामुळे मी आज पोलीस अधीक्षक पदावर पोचलो. फक्त अधिकारी म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून जो काही मी आहे त्यांत माझ्या आईचे सर्वात मोठे स्थान आहे.