दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
शेंबा.(नांदुरा). दि.६. जी.प.के.मराठी प्राथमिक शाळा शेंबा येथे शासकीय कामानुसार ग्राम पंचायत अंतर्गत पेवर ब्लॉक बसवण्याचे कामाचे उद्घाटन दि.६/८/२०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता कर्तव्यदक्ष सरपंच ॲड. नंदकिशोर खोंदले यांच्या वतीने सुधाकर बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच नंदकिशोर खोंदले यांनी सांगितले मराठी शाळेचा दर्जा उंचावण्यात आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. आम्ही आमच्यापरीने सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. याप्रसंगी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष किशोर वाकोडे यांनी शाळेचा मुख्य ( जुना) रस्ता चालू ध्वजारोहण दिनापर्यंत (१५/२०२२ ऑगस्टपर्यंत) करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन शेंबा येथील कर्तव्यदक्ष सरपंच नंदकिशोर खोंदले यांना दिले. या अगोदर सरपंच यांनी गावाच्या हद्दीतील रोडची (खड्डे पडले असताना) मुख्य समस्या हाताळली असताना लोटांगण आंदोलन करणार होते. या आंदोलनाची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी खड्डे बुजवण्यात आले. हा तर गावातील मुलांचा शाळेचा मुख्य रस्ता आहे. आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल ग्रामपंचायत सरपंच सह सचिव, सदस्य नक्कीच घेतील. यात शंकाच नाही. आता पावसाळ्याचे दिवस असून पावसामुळे शाळेच्या रस्त्यावर पाणी साचले असता लहान मुलांना येण्या जाण्याचा त्रास होतो. सदर या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. या रस्त्यावर भरती टाकली तरी सुद्धा लहान मुलांना त्रास होत आहे. शाळेतील मुलांचे पालक, शालेय शिक्षण कमिटी, शिक्षक , व गावकऱ्यांच्या वतीने शाळेचा जुना रस्ता १५ ऑगस्ट पर्यंत चालू करण्यात यावा ही मागणी होत आहे. सदर उद्घाटन प्रसंगी कर्तव्यदक्ष सरपंच ॲड. नंदकिशोर खोंदले,तथा सुधाकर बोरकर, प्रवीण भिडे, सुरेंद्र चौधरी, कैलास सुशीर, सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा मुख्याध्यापक, बालोद सर, पाटील सर, कुलकर्णी सर, तर ग्रामस्थ बहादुर भिडे, राजेंद्र इंगळे, सिद्धार्थ भिडे,दिवणाले, निलेश दाभाडे आदी. उपस्थित होते. त्याप्रसंगी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष किशोर वाकोडे यांनी शाळेचा मुख्य रस्त्या चालू करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन सरपंच नंदकिशोर खोंदले यांना दिले.