दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
ह्रदय माझे एवढे स्वस्त नाही कोणालाही द्यायला,
खूप वेळ लागेल ग वेडे तूला मी समजायला..धृ
या ह्रदयात बाबांचा घाम आईच प्रेम लपलय ग,
बाबांचा राहीलेल अधूर स्वप्नसूध्दा दडलंय ग,
लई कष्ट केलेत ग मला ईतपरेंत पोहचायला,
खूप वेळ लागेल ग वेडे तूला मी समजायला…१
या ह्रदयाला विश्वासांचा बसलाय ग तडा,
उगच शांत पाण्यात मारू नकोस ग खडा,
आताच सूर्वात केली स्वताच्या पायावर चालायला,
खूप वेळ लागेल ग वेडे तूला मी समजायला…२
या ह्रदयाला पण वाटत ग मोकळ आनंद स्वास घाव,
आसच प्रेमाच्या झूळकेत हारपून जाव,
मोठ्या आसेन पाहतात ग माझ्या वागण्याला,
खूप वेळ लागेल ग वेडे तूला मी समजायला….३
✍✍✍✍✍
कवी प्रा.नारायण त्र्यंबकराव आडे
(जि.सं.गोर सिकवाडी परभणी)
मो.9623959261/9284160492