दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:मुखेडातील छोटे- मोठ्या व्यापाऱ्यांना नामांकित बँकेचे लाखो रूपयाचे लोन काही दिवसात काढून देतो म्हणत एका भामट्याने आमिष देऊन शहरातील १२ व्यापाऱ्यांकडून तब्बल ९३ हजार ५०० रुपयाला गंड घातला असून सदरील व्यापारी या लुटारु भामट्याच्या आमिषाला बळी पडले असून हा भामटा मात्र या व्यापाऱ्यांना झुंगारा देत मोकाट फिरत असल्याची माहिती व्यापारी देत असून या भामट्यावर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
भामट्याने काही दिवस आगोदर व्यापाऱ्यांच्या दुकानवर जाऊन आमच्याकडे नामांकित बँकेचे लोन काही दिवसात मिळतील, असे म्हणत प्रसिध्दीपत्रक वाटप केले व या प्रसिद्धी पत्रावर होम लोन, पर्सनल लोन, मॉडगेज लोन, व्यवसायासाठी लोन व शिक्षणासाठी लोन तात्काळ मिळेल, असे नमूद केले व हे लोन दुकानदार, हॉटेल चालक, हॉटेल आणि कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना लोन, प्लॉट खरेदी लोन व घर खरेदी करणाऱ्यांना लोन मिळवून दिले जाईल म्हणून आमिष दाखवले व या प्रसिद पत्रावर त्या भामट्याचा मोबाईल क्रमांक दर्शविले असल्याने व्यापारी त्याच्या भुलथापाला बळी पडले. यात राजीव रणभिडकर यांना ९ हजार, पवार रामदास ९ हजार, राठोड परमेश्वर २० हजार, ढगे गजानन ८. हजार, देशमुख यादव ७ हजार, थावरे गोविंद ७ हजार, यादव देशमुख ७ हजार, वाडिकर नागेश ७ हजार, बालाजी गायकवाड ६ हजार ५००, संजय नावंदे ७ हजार ५००, पेरसे ६ हजार ५०० व मारोती पांचाळ ६ हजार रुपये असे ९३ हजार ५०० रुपये काही दिवसात लोन मंजूर करतो म्हणून घेतले असल्याची माहिती यातील काही व्यापाऱ्यांनी दिली आहे.