दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
इस्लापूर येथून जवळच असलेल्या कुपटी (बु) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका वर्गाची तीन पत्रे मागील दोन वर्षांपूर्वी उडून गेल्याने येथील 63 विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे
येथील पालक वर्गातून वेळोवेळी पाठपुरवठा करून देखील या इमारतीची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . याचा फटका त्यांच्या शिक्षणावर होत आहे यामुळे पालक वर्ग चिंतीत आहे एकीकडे शासनाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत लाखो रुपये खर्च केले जात असून येथील विद्यार्थी मात्र याला अपवाद ठरले आहेत शालेय व्यवस्थापनसमितीचे अध्यक्ष गणपत डुकरे व येथील पालकांनी शाळेला नवीन इमारत द्यावी अशा मागणीची निवेदन पंचायत समिती किनवट यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती परंतु अद्यापही त्यांना प्रतिसाद मिळाला नसून विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागत आहे मागील महिन्यात मुसळधार पावसाने शाळेच्या परिसरात चिखल सासल्याने पालकांनी वर्गणी करीत शाळेच्या पटांगणात स्वखर्चाने मुरूम देखील टाकला सदरील शाळेचे बांधकाम अत्यंत जुन्या असल्याने या वर्गाच्या भिंती देखील पडल्या असून, तसेच याच शाळेच्या परिसरात असलेल्या अंगणवाडीची इमारत देखील धोकादायक बनली असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नवीन इमारत बांधून द्यावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत डुकरे , रामदास मोरे श्रीराम , धुमाळे प्रल्हाद ,चांदोड व पालकांनी केली.