दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी फलटण -संभाजी गोसावी
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गेले जून ते जुलै महिन्यापासुन अवैध धंद्यावर चांगलाच पोलिसांचा छापा पडत आहे. अशीच एक धडाकेबाज कारवाई फलटण ग्रामीण पोलिसांनी केली असुन यामध्ये पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन पोलीस हवा. बबन रघुनाथ साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना अवैध ताडी-विक्री बाबत माहिती मिळाली त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्यांच्या सुमारांस गुणवरे ता. फलटण गावच्या हद्दीमध्ये बंडा अण्णासाहेब जाधव यांच्या बंद घरांच्या समोर हिरव्या नेटच्या आडोशाला संशयित अशोक इरत्रा भंडारी वय ४७ गिरवी ता. फलटण) हा त्याच्याकडे असलेली ताडी लोकांनी पिल्यांवर त्यांना नशा येऊन आरोग्यांस दुखापत होऊ शकते अथवा एखाद्यांने जास्त पिल्यांने त्यांस मरण येऊ शकते हे त्यांना माहीत असताना सुद्धा तो बेकायदेशीररित्या ताडी करीत होता याबाबत फलटण पोलीसांनी ग्रामीण त्यांस ताब्यांत घेवुन सुमारे या छाप्यांमध्ये १ लाख २४ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरर्डे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी पोलीस हवा. बबन साबळे पोलीस हवा.अमोल करणे, पोलीस हवा.दीपक बर्डे पोलीस कॉ.गणेश अवघडे आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.